जगणे गोंदून घेताना
डॉ राजेंद्र माने
११ नोव्हेंबर २०२५
डॉ. अदिती काळमेख यांच्या ‘जगणे गोंदून घेताना’ या कवितासंग्रहात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जाणवणाऱ्या भावना, नात्यांचा ओलावा, मनातील घुसमट आणि जगण्याची जिवट ओढ अशा सगळ्या संवेदनांचा तरल प्रवास दिसतो. डॉ. राजेंद्र माने यांनी या कवितांमधून उमटलेल्या स्त्रीमनाच्या गाभ्यातल्या लहरींना, विचारांना आणि अनुभूतींना ज्या संवेदनशीलतेने शब्द दिले आहेत, त्यामुळे हा आलेख केवळ समीक्षण न राहता एक भावनिक सहप्रवास …